पुणे

जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा बदललेला रंग सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरला आहे. पर्यावरणाबद्दलची देशातील जागरूकता बघता, निसर्गाचा हा अनमोल ठेवा धोक्यात आला की काय? अशी चिंताही व्यक्त केली गेली. पण सरोवराचे पाणी गुलाबी होणं हि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे, लोणारचे अभ्यासक आंनद मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

लोणारच्या खाऱ्या पाण्यात स्पुरिलीना नावाचे शैवाळ आणि काही बॅक्टरीया मोठ्या प्रमाणावर आढळतात. मागील काही वर्षांचा कमी पाऊस आणि वाढते बाष्पीभवन यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी घटली आहे. पर्यायाने बॅक्टेरियाचे पिगमेन्टेशन ही जैविक प्रक्रिया होऊन सुरवातीला रंग पिवळा झाला, पण खऱ्यापाण्यात ही स्थिती टिकाव धरू शकली नाही. त्यातील बीटा केरोटीनमुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला. त्यामुळे पाणी गुलाबी दिसू लागल्याचे मिश्रा यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजेच मे आणि जून महिन्यात अशी स्थिती दिसण्याची शक्यता असते. कारण त्यावेळी पाण्याची कमी पातळी आणि बाष्पीभवन दोन्ही जास्त असते.

ण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

असे जरी असले तरी दिवसेंदिवस लोणार सरोवराच्या कमी होणाऱ्या पाण्याच्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. सरोवराच्या आजूबाजूला उभ्या राहिलेल्या मोठ्या आस्थापणामध्ये 'बोर' घेतल्यामुळे पाण्याचे स्रोत कमी झाल्याचे बोलले जात होते. पण अशी स्थिती इथे नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात थरार! धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला रेल्वे कर्मचाऱ्याने मृत्यूच्या दारातून खेचले

Nanded: नांदेडच्या वसंतनगर–मगनपुरात उघड्या नाल्या, खड्डेमय रस्ते आणि वीज समस्येमुळे नागरिक हैराण; प्रशासनाविरोधात संताप

Latest Marathi News Update : अमित शहांसोबत बैठकीत राजकीय चर्चा नाही- एकनाथ शिंदे

Beed: विषारी दुधाने बीडकरांचे आरोग्य धोक्यात; रॅकेट पुन्हा सक्रिय; अन्न व औषध प्रशासन सुस्तच, कारवाईची मागणी

IMD Weather Forecast : सोशल मीडिया की IMD? हवामानाचा अचूक अंदाज कुठून घ्यावा? हवामान तज्ज्ञांनी सांगितली पेरणी ते काढणीपर्यंतची सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT