PCMC
PCMC 
पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना अभ्यास दौरे कसे ठरले फायद्याचे?

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका अधिकारी अनेकदा देश, विदेशातील शहरांच्या अभ्यास दौऱ्यावर जातात. याबाबत, ‘नागरिकांच्या कररूपी पैशांची उधडपट्टी?’, ‘दौऱ्यातून शहराला काय मिळाले?’, ‘अभ्यास दौरा म्हणजे निव्वळ फार्स किंवा पर्यटन,’ अशी टीका केली जाते. परंतु, गेल्या पंधरा ते वीस वर्षांत झालेल्या दौऱ्यांचे निरीक्षण केल्यास शहराला चांगले काही ना काही मिळाले आहे. त्यामुळे दौऱ्यांमुळे शहराला फायदाच झालेला असल्याचे दिसते.

साधारणतः महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा गाजला तो धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा. आयुक्त दिलीप बंड असताना हा दौरा करण्यात आला. शिरपूर नगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी २४ बाय सात योजना राबवली होती. तसेच, ओला व सुका कचरा विलगीकरण केला जात जातो. उद्यानांमध्ये लहानमुलांसाठी झुकझुकगाडी त्यांनी ठेवलेली होती. या दौऱ्यावरून आल्यानंतर तत्कालीन कारभाऱ्यांनी ‘शिरपूर पॅटर्न’ शहरात राबविण्याचे ठरविले. त्यानुसार कामे सुरू केली.

नेहरूनगर गुलाब पुष्प उद्यान, भोसरी सहल केंद्र, थेरगावचे केजू देवी उद्यान आदी ठिकाणी झुकझुकगाडी सुरू केली. पाणीपुरवठ्यासाठी स्काडा प्रणाली विकसित करून २४ बाय सात योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी केंद्र सरकारचे अर्थसाह्य लाभले. 
शहराच्या जवळपास चाळीस टक्के भागात २४ बाय सात योजना राबविण्यासाठी कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नळजोड बदलणे, पाणी मीटर बसविणे अशी सुमारे सत्तर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, ओला व सुका कचरा घरच्या घरी वर्गीकरण करून कचरा संकलकांकडे दिला जात असल्याचे त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रयोग सुरू केला आहे. 

तसेच, भूमिगत गटार योजना, ट्री गार्ड योजना, व्हर्टिकल गार्डन, पिंपळे सौदागरचे लिनियर गार्डन, निगडी, नाशिक फाटा येथील बहुमजली उड्डाण पूल, तसेच, निगडी, पिंपरी, वल्लभनगर व नाशिक फाटा येथील मल्टिपर्पज ट्रान्स्पोर्ट हब; इंद्रायणी, पवना व मुळा नदी सुधारप्रकल्प हे अभ्यास दौऱ्यांचेच फलीत आहेत. त्यांना राज्य व केंद्र सरकारची साथ मिळालेली असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT