पुणे

‘एचपीव्ही’ लसीकरणाला पुण्यात संथ प्रतिसाद

CD

पुणे, ता. १२ : गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेला शहरात संथ प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांत आयोजित १,०७१ सत्रांमध्ये केवळ ७६६ मुलींनी लसीचा डोस घेतला असून, उपलब्ध २० हजार डोसच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ८ मार्चपासून (महिला दिन) हे मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी ‘मर्क’ कंपनीची ‘गार्डासिल-९’ ही लस वापरली जात असून महापालिकेला याचे २० हजार डोस प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि प्रसूतिगृहांमध्ये गर्भवती व बालकांचे लसीकरण दिवस वगळून ही सत्रे राबविली जात आहेत. मात्र, जनजागृतीच्या अभावामुळे किंवा अन्य कारणांमुळे या मोहिमेला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे.

कर्करोग प्रतिबंधासाठी ही महत्त्वाची लस आहे. गर्भाशयमुखाला ‘ह्यूमन पॉपिलोमा व्‍हायरस’ (एचपीव्ही) विषाणूंपासून कर्करोग होतो. त्‍यापासून ही लस संरक्षण करते. नागरिकांनी गैरसमज टाळावा. ती योग्य वयात दिली गेली तर ती उपयुक्त ठरते. तिचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. कर्करोग होऊन उपचार करण्‍यापेक्षा तो होऊच नये यासाठी ही लस मुलींनी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. रोहिदास बोरसे, माजी विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, ससून रुग्णालय

मुलींच्या लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. महापालिकेच्‍या दवाखान्यात दररोज ३०० मुलींचे लसीकरण होऊ शकते. शाळांना सुटी लागली असली तरी सर्व दवाखान्यांत लसीकरण सुरू राहणार आहे.
- डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

‘एचपीव्ही’ लसीकरणाचे फायदे
- जागतिक आरोग्य संघटनेची लसीकरणाला मान्यता
- गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण
- तोंड, घसा, गुदमार्ग आणि जननेंद्रियांशी संबंधित काही कर्करोगांचा धोका कमी
- भविष्यातील कर्करोग उपचारांचा खर्च आणि मानसिक ताण कमी होतो
- सुरक्षित आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त लस
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील कर्करोगाचा भार कमी होण्यास मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT