SSC and HSC Board Sakal
पुणे

बारावीच्या निकालाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत

बारावी परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालावर काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर संबंधित विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत राज्य मंडळाकडे अर्ज करता येणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेल्या निकालावर काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर संबंधित विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत राज्य मंडळाकडे अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य मंडळामार्फत आणि अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या २०२१ च्या मुल्यमापनासंदर्भात दाखल याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्ये निकाल दिला आहे. त्यानुसार या परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला. परंतु बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील, तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार राज्य मंडळामार्फत बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप, तक्रारी असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत तक्रार अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी यांची नोंद घ्यावी, असे डॉ. भोसले यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर गाभारा संवर्धन पूर्ण; आजपासून दर्शन सुरू

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

SCROLL FOR NEXT