gayatri-pasalkar 
पुणे

HSC RESULT : यंदा मात्र आनंद चार भिंतीतच साजरा करावा लागला (Video)

सकाळवृत्तसेवा

पुणे - कधी एकदाचा बारावीचा निकाल लागतोय आणि आपण मस्तपैकी पेढे वाटतोय, कुटुंबियांबरोबर आनंद साजरा करतोय, एवढचं काय, मित्रमैत्रीणीच्या घरी जाऊन सेलिब्रेशनची पार्टी देखील देतोय असे होऊन जाते. पण यंदा मात्र हा आनंद चार भिंतीतच साजरा करावा लागला. निकाल लागल्यावर यावेळी ‘ना पेढे होते, ना सेलिब्रेशनची पार्टी.’ कारण यंदा बारावीचा निकाल लागला तोच, ‘लॉकडाऊन‘मध्ये. 

बारावीच्या परीक्षेसाठी ज्यांनी रात्रदिवस अभ्यास केला, नियोजनपूर्वक पेपर सोडविले आणि आपला ‘रिझल्ट‘ कसा असेल, हे घरच्याना पटवुनही दिले, ती मंडळी निकाल लागल्यानंतर नेमके कसे एन्जॉय करायचे हे ठरविण्यास तरी कशी विसरतील. त्याविषयीच्या अनेक कल्पना विद्यार्थी- विद्यार्थीनीनी आपापल्या मनात केल्या होत्या. 

एवढे सगळे नियोजन केले, पण कोरोनाने त्यांच्या आनंदावर विरजण पाडले. सेलिब्रेशन, पार्टी वगैरे जाऊ द्या, पण शहर बंद असल्याने पेढेही वाटता आले नाहीत. दुपारी निकाल ऑनलाइन पाहिला. चांगले गुणदेखील मिळाले. पण हा आनंद साजरा करता आला नसल्याची भावना बारावी उत्तीर्ण झालेल्याच्या मनात होती. यातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढत अनेकांनी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या ऑनलाईन भेटी घडवून आणत निकालाचा आनंद साजरा केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळतील, असा विश्वास होता. परंतु ९४.७६ टक्के मिळतील, अशी अपेक्षा नव्हती. मला कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटोमधील शिष्यवृत्ती मिळाली असून लवकरच उच्च शिक्षणासाठी तेथे जाणार आहे. मी कॉग्नेटीव सायन्स आणि ब्रेन सायन्समध्ये शिक्षण घेणार आहे.
- सेरा गांधी, फर्ग्युसन महाविद्यालय

(​Edited By : Kalyan Bhalerao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT