पुणे

प्रकाश सापळ्याद्वारे हुमणी भुंगेऱ्याचे व्यवस्थापन

CD

प्रकाश सापळ्याद्वारे हुमणी भुंगेऱ्याचे व्यवस्थापन

डॉ. अमोल काकडे, डॉ. प्रशांत भोसले
--------------------------
राज्याच्या अनेक भागांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या भुंगेरा वगळता बहुतेक सर्व अवस्था या जमिनीच्या आतमध्ये होतात. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे बाहेर येण्याच्या मे- जून महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या वळवांच्या पावसावेळी सामुदायिकरीत्या प्रयत्न करणे आवश्यक असते.
------------------------------
मे-जूनमध्ये होणाऱ्या वळवाच्या पावसामध्ये हुमणी किडीचे भुंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर येतात. ते खाद्य आणि मीलनासाठी बाभूळ, कडुनिंब यांसारख्या झाडांवर गर्दी करतात. ते खाली पाडून गोळा करून नष्ट करणे, या उपायामुळे पुढील हंगामातील हुमणी किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते. या भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे (Light Traps) हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. या लेखामध्ये आपण प्रकाश सापळा कसा तयार करायचा, याची माहिती घेऊ.

प्रकाश सापळा कसा तयार करायचा?
साहित्य ः एक मोठे प्लॅस्टिकचे घमेले, १००/२०० वॉटचा बल्ब, डिझेल किंवा रॉकेल इ.
निर्मिती ः शेताच्या बांध, कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एका खांबावर ५-६ फूट उंचीवर वायरची व्यवस्था करून बल्ब लावावा. त्याच्या बरोबर खाली ३-४ फूट व्यासाचे घमेले ठेवावे. त्यात पाणी घेऊन थोड्या प्रमाणात डिझेल किंवा रॉकेल मिसळावे.

सापळ्याचे स्थान व वेळ ः
प्रभावी क्षेत्र : १ हेक्टर क्षेत्रासाठी १ ते २ प्रकाश सापळे पुरेसे असतात.
जागा ः बांधावर चालू शकते. पण शेतातील कडुनिंब आणि बाभळीखाली अधिक प्रभावी ठरतो.
वेळ ः संध्याकाळी ७ ते ९ प.
कालावधी : मेअखेर ते जून महिन्याच्या सुरुवातीला हा उपक्रम सतत राबवावा. हिला चांगला पाऊस पडल्यानंतर लगेचच हे सापळे लावल्यास जास्तीत जास्त भुंगेरे गोळा होतात.

...असा होतो फायदा
एका प्रकाश सापळ्याकडे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात. त्यातील दररोज किमान १०० भुंगेरे खाली ठेवलेल्या रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात. त्यातील ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी भुंगेरे असले, तरी त्यांच्या मिलनातून संभाव्य पिढीच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो.
एक मादी भुंगेरा ५० ते ६० अंडी घालते. त्यातून किमान ५० हुमणीच्या अळ्या तयार होऊ शकतात. त्याला आळा बसतो. एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते.
महत्त्वाची बाब म्हणजे या वेळी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पाऊस व पावसाचे खंड यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. हुमणीचे भुंगेरे मॉन्सून पाऊस सुरू होईपर्यंतच म्हणजेच २० ते २५ जूनपर्यंत दिसतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरीत्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक प्रकाश सापळा लावला तरी पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होईल. पुढे नियंत्रणासाठी मोठा खर्च करण्यापेक्षा आता प्रतिबंधात्मक उपाय करणे कधीही फायद्याचा सौदा आहे.

अन्य फायदे :
- रासायनिक फवारणीची गरज कमी होते. भुंगेरे मोठ्या प्रमाणात सापळ्यात अडकतात, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
- जैवविविधतेला धक्का न लावता फक्त हानिकारक किडींचा नाश होतो.
- सापळ्यात अडकलेले भुंगेऱ्यावरून संभाव्य प्रादुर्भावाचे स्वरूप कळते.

डॉ. अमोल काकडे, ९४०४१४४५६५
विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, परभणी
--------------
PNE26W17848 हुमणी किडीच्या सामुदायिक नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर प्रभावी ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT