पुणे

विदेश संक्षिप्त

CD

*युरोप
हल्ल्याबद्दल समन्स
बुडापेस्ट : युक्रेनवर हल्ले करताना हंगेरीच्या सीमेजवळ जोरदार हल्ले केल्याबद्दल हंगेरी सरकारने रशियाच्या राजदूताला पाचारण करत नाराजी व्यक्त केली. या हल्ल्यांमुळे हंगेरीच्या स्वायत्ततेला आव्हान मिळून सामान्य नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाल्याची टीका हंगेरीने केली. हंगेरीने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांना प्रथमपासूनच विरोध केला आहे.

पंतप्रधानांचा राजीनामा
रिगा : लाटव्हिया देशाच्या पंतप्रधान एव्हिका सिलिना यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आघाडी सरकारमधील डाव्या विचारसरणीच्या प्रोग्रेसिव्ह पार्टी या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आल्याने सिलिना यांनी राजीनामा देत नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला. अनेक समस्यांची योग्यप्रकारे हाताळणी करण्यात सरकारला अपयश आल्याने मागील आठवड्यातच संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

‘व्हॉट्‌सॲप’कडून सुविधा
लंडन : व्हॉट्‌सॲपच्या ‘एआय’ चॅटबॉटशी ग्राहकांनी केलेल्या संवादाचा खासगीपणा जपला जावा, यासाठी ‘व्हॉट्‌सॲप’ची पालककंपनी असलेल्या ‘मेटा’ने ‘इन्कॉग्निटो’ हा मोड ॲक्टिव्हेट केला आहे. अनेक ग्राहक ‘एआय’चा वापर करताना खासगी माहितीही देत असल्याने या माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही सुविधा सुरू केली असल्याचे आणि ही माहिती ‘मेटा’ला देखील पाहता येणार नाही, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

राजधानीवर हल्ले
किव्ह : रशियाने आज पहाटे युक्रेनची राजधानी किव्ह शहरावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रशियाने डागलेली ४१ क्षेपणास्त्रे आणि ६५२ ड्रोन हवेतच नष्ट अथवा निकामी केले. तर, १५ क्षेपणास्त्रे आणि २३ ड्रोन लक्ष्यावर आदळली. या हल्ल्यामुळे अनेक इमारतींचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले.

भारताकडून आभार
लिस्बन : अमलीपदार्थांचा व्यापार करणारा दहशतवादी इक्बाल सिंह याचे हस्तांतर केल्याबद्दल भारत सरकारने पोर्तुगीज सरकारचे आभार मानले आहेत. पोर्तुगालने हस्तांतर केल्यानंतर ‘एनआयए’ने बुधवारी इक्बाल सिंह याला अटक केली. इक्बाल सिंह हा २०२० पासून फरार होता. भारत आणि पोर्तुगालदरम्यान झालेल्या गुन्हेगार हस्तांतर कायद्याअंतर्गत त्याला भारताच्या हवाली करण्यात आले.

*आशिया
पाच सैनिक ठार
कराची : बलुचिस्तानमधील बारखन जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले. या चकमकीत सात दहशतवादीही मारले गेले. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली होती. घटनास्थळावरून सैनिकांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पाकिस्तानी सैनिकांनी मागील पाच महिन्यात बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात अनेक मोहिमा राबविल्या आहेत.

*पश्‍चिम आशिया
गुप्तभेट नाही
जेरूसलेम : इराणविरोधात युद्ध सुरू असताना इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) गुप्तपणे भेट दिल्याचा आरोप ‘यूएई’ने फेटाळला आहे. नेतान्याहू आणि ‘यूएई’चे अध्यक्ष शेख महंमद बिन झायेद अल नाहयान यांची एका कार्यक्रमात भेट झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केल्यानंतर ‘यूएई’ने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe: राष्ट्रवादीचा 'आनंद' दुरावला! परांजपेंनी पक्षाला रामराम ठोकला; पण तडकाफडकी निर्णय नेमका का घेतला?

Breaking: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, तिलक वर्मा कॅप्टन! तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

"त्या एका गोष्टीसाठी मी थांबले..."; सैफपासून वेगळं झाल्यावर अमृता सिंह का राहिली अविवाहित? म्हणाली-

Sharad Pawar: “कुणी बाइकवर, कुणी पायी... पण हा फक्त दिखावा”; शरद पवारांचा नेत्यांच्या ताफ्यावर प्रहार, म्हणाले दीर्घकालीन धोरण हवे

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये एसटीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT