Hurricane
Hurricane 
पुणे

‘महा’चक्रीवादळाचा गुजरातला धोका

सकाळ वृत्तसेवा

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
पुणे - अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. बुधवारी (ता. ६) रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि द्वारका दरम्यान किनारपट्टीला धडकणार आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याबरोबरच गुजरात, कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अति जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

रविवारी (ता. ३) ‘महा’ चक्रीवादळ अतितीव्र झाले. ही प्रणाली गुजरातच्या वेरावळपासून ५५०, तर दिवपासून ५८० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होती. आजपासून (ता. ४) हे वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे झेपावणार आहे. बुधवारी (ता. ६) रात्री उशिरा चक्रीवादळ ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने दीव आणि द्वारका दरम्यान गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. परिणामी, पुढील दोन दिवस महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून अतिउंच लाटा उसळणार आहेत.

तसेच बुधवारी (ता. ६) आणि गुरुवारी (ता. ७) गुजरात, कोकण किनारपट्टीवर अतिजोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्र आणि म्यानमारच्या किनारपट्टीलगत वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आज कमी दाब क्षेत्राची तीव्रता निर्मिती होणार आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ते पूर्व किनारपट्टीकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. कमी दाब क्षेत्रामुळे अंदमान निकोबार बेटांवर अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. सकाळच्या वेळी धुके आणि दव पडण्याबरोबरच हवेत गारठा वाढत आहे. मात्र, ढगाळ हवामानामुळे अद्याप थंडी वाढलेली नाही. राज्यात किमान तापमान २० ते २३ अंशांदरम्यान आहे. ढगाळ हवामान व पावसाळी वातावरण निवळताच पुढील आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. ३) राज्याच्या अनेक भागांत कमाल तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे २९.६ (-१.१), जळगाव २८.४(-५.१), कोल्हापूर ३०.३(-०.५), महाबळेश्वर २३.८(-१.८), मालेगाव २८.२ (-४.१), नाशिक २९.३ (-२.१), सांगली ३०.३ (-०.५), सातारा २३.८ (-१.८), सोलापूर ३२.२ (०.४), अलिबाग ३१.६ (-१.८), डहाणू ३२.८ (-०.२), सांताक्रूझ ३३.१ (-१.१), रत्नागिरी ३३.२(-०.६)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT