पुणे

मुलासह पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या; खानापूरमध्ये आढळला मृतदेह

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : आई व मुलाच्या खुन प्रकरणातील बेपत्ता असलेल्या वडील आबिद शेख याने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. खडकवासला येथील खानापुर गावाच्या हद्दित शेख याचा मृतदेह आढळला. (Abid Sheikh father commits suicide In mother-son murder case in pune)

धानोरी येथील आलिया आबिद शेख (वय 35) व त्यांचा मुलगा आयान आबिद शेख (वय 6) यांचा खुन करून आयानचा मृतदेह कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ तर आलिया शेख यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्ता येथे टाकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ व पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेपासून आयानचा वडील आबिद शेख हा बेपत्ता होता.

आबिद शेख याने फिरायला जाण्याच्या निमित्ताने आई व मुलाला सोमवारी बाहेर नेले. त्यानंतर दोघांचा खुन करुन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह टाकून दिले होते. त्यानंतर त्याने त्याच्याकडील कार मार्केटयार्ड जवळ सोडली. त्यानंतर तो रिक्शाने नळस्टॉपला गेला. तेथून तो खानापुर येथे गेला. आई व मुलाच्या खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर तसेच याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच या खुनाबाबत संशयाची सूई आबिदवर फिरत असल्याने पोलिसांकडून त्याचा कसून तपास सुरु होता.

पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलिसांची 6 पथके आबिदचा शोध घेत होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी खानापुर येथे आबिदचा मृतदेह सापडला. पत्नी व मुलाचा खुन केल्यानंतर आबिदने आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT