पुणे

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा

चाकण - पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल नथू बच्चे (वय ३७, रा. राजगुरुनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  

पूनम विठ्ठल बच्चे (वय ३०, रा., राजगुरुनगर, खेड), तिचा प्रियकर राजेंद्र बाळासाहेब आसने (वय २१, रा. चाकण), नीलेश गोरक्षनाथ अनुसे (वय २३, रा. मेदनकरवाडी) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तिघांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश खेड न्यायालयाने दिल्याची माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिली. विठ्ठल बच्चे हे आंबेठाण येथील महिंद्रा सीआयई कंपनीत कामाला होते. ६ ते ७ जुलैच्या दरम्यान भाम-रोहकल रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल बच्चे यांचा मृत्यू झाल्याची खबर बच्चे यांचा भाऊ बाळू बच्चे यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी तशी नोंद केली. यानंतर पोलिसांनी विठ्ठल बच्चे यांची पत्नी पूनम हिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने पती कंपनीत कामाला चालले होते. त्या वेळी अपघात झाला असे सांगितले. पोलिसांनी कंपनीत चौकशी केल्यानंतर बच्चे यांना कंपनीत कामास बोलविले नसल्याचे समजले. पत्नी पूनम खोटे बोलत असल्याचे पोलिसांना समजले. पूनम हिचे आसने याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. त्यानंतर आसने याचा मित्र नीलेश अनुसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने बच्चे यांचा अपघात झालेला नसून पूनम हिने तिचा प्रियकर राजेंद्र आसने याच्या मदतीने त्याचा खून केला आहे, अशी कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT