स्थानकांत हुतात्मादिनी
महाराष्ट्रगीत लागणार?
रेल्वेला मराठी अभ्यास केंद्राचे साकडे
मुंबई, ता. १६ : हुतात्मा दिनानिमित्त राज्यातील सर्व स्थानकांवर शनिवारी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ ही गीते वाजविण्यासह १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची माहिती देणाऱ्या विशेष उद्घोषणा करण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. यासंदर्भात मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनासह रेल्वे बोर्डालाही निवेदन देण्यात आले आहे. छठपूजेच्या भाेजपुरी गीतांच्या वादावरून राज्यातील रेल्वे स्थानकांवर अन्य राज्यांतील सणांना महत्त्व दिले जात असल्याचा आक्षेपही केंद्राने घेतला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण नव्या पिढीला व्हावी आणि प्रवाशांना महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती मिळावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आणि ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ या गीतांची मागणी करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर गोळीबार झाला होता. या आंदोलनात अनेक आंदोलक हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ नोव्हेंबरला हुतात्मा दिन पाळला जातो. या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत उद्घाेषणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि कार्यवाह आनंद भंडारे यांनी ही निवेदने दिली आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित स्थानकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.