shortage coal  e sakal
पुणे

कोळसा तुटवड्याच्या काळात जलविद्युत केंद्र देताहेत साथ

राज्याची विजेची उच्चांकी मागणी 28500 वर पोहचली

नीलेश छाजेड : सकाळ वृत्तसेवा

एकलहरे : एकीकडे देशासह राज्यातील संप मिटला आणि दुसरीकडे राज्याची उच्चांकी मागणी 28500 वर पोहचली असून महानिर्मिती पण निर्मिती साठी सज्ज झाली व 9200 मेगा वॅट वीज निर्मिती शिखर मागणीच्या कालावधीत नोंदवली गेली.कोळसा तुटवड्याचा प्रश्न अजूनही महानिर्मिती ला भेडसावतोय चंद्रपूर व खापरखेडा सोडले तर सर्व वीज केंद्रात दोन वा तीन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे बरेचसे संच कमी क्षमतेने सुरू असताना मात्र कोयना जलविद्युत व इतर छोटे जलविदुयत केंद्रांनी चांगला भार उचललाय .

सुमारे 1700 मेगा वॅट वीज निर्मिती आज सकाळी कोयना जल विद्युत प्रकल्पातून सुरू होती.परंतु जल विद्युत निर्मिती लाही काही प्रमाणात मर्यादा येतात.उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला असून कोयना चा पाणी वापर पुढील दोन अडीच महिने जपून करावा लागेल.67.5 टी एम सी ट्रीलिअन घनमीटर हा कोटा 31 मे पर्यंत पुरवायचा असतोजल विद्युत साठी जलवर्ष जून ते मे असे नियोजन असते.त्यानुसार येत्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करून वीज निर्मिती चा हेतू साध्य करावा लागेल असे एकंदरीत चित्र आहे.

कोयना 1 व 2 मधून 510 मेगा वॅट, कोयना 3 मधून 234 तर कोयना संच 4 मधून 987 मेगा वॅट अशी वीज निर्मिती सुरू होती.के डी पी एच मधून 18 मेगा वॅट व भिरतार 56 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती.तर काल संप माघार होताच काही तासात नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक 4 मधून निर्मिती सुरू करण्यास येथील अभियंते व कामगार वर्गास यश मिळाले.तर मनुष्यबळामुळे बंद असलेले चंद्रपूरच्या संच क्रमांक 6 मधून ही पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू झाली आहे.जल विद्युत केंद्रांनी या कालावधीत उत्तम प्रकारे साथ दिल्याने राज्याला वीज तुटवडा जाणवला नाही.

कोयना धरण क्षमता 1960 मेगा वॅट

  • पाणी विसर्ग पहिला टप्पा 164 क्युमेंक्स

  • पाणी विसर्ग दुसरा टप्पा 164 क्युमेंक्स

  • पाणी विसर्ग तिसरा टप्पा 260 क्युमेक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT