Kirit-Somaiya टिम ई सकाळ
पुणे

माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांकडून हल्ला; किरीट सोमय्यांचे ट्विट

माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचे किरीट सोमय्यांनी ट्वीट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी ते पुणे महापालिकेत आले होते. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya )यांच्या विरोधात पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. किरीट सोमय्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. घेराव घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी गुंड असे संबोधले आहे.

पुणे महापालिकेत पोहचल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्यांना विरोध झाला. यासंदर्भात त्यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया दिलीये. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) परिसरात माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला, अशा शब्दांत ट्वीट करत किरीट सोमय्यांनी शिवसेना हा गुंडागिरी करणारा पक्ष आहे, असा शाब्दिक हल्ला केला आहे. यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत भाजप नेते किरीट सोमय्या आले होते.

किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार (Vikram Kumar ) यांना निवेदन देण्यासाठी येणार असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली होती. जवळपास 100 शिवसैनिक महापालिकेच्या आवारात आधीपासून उपस्थितीत होते. सोमय्या यांची गाडी जुन्या इमारतीच्या दिशेने आली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकरत्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. नव्या इमारतीकडून अन्य शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत सोमय्यांना गराडा घातला. परिसरात एकत गोंधळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT