पुणे

Amit Thackeray : मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही : अमित ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

Amit Thackeray Pune Tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मला संजय राऊत यांची रिप्लेसमेंट नाही बरं का असं विधान केले आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी आज पत्रकारांची अनौपचारिक संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मी गृहमंत्री होणार ही अफवा होती, पण पुढचे २० दिवस मला पत्रकार याबाबतच विचारत होते. ही बातमी खोटी आहे, हे सांगून मी थकलो होतो. म्हणून मी म्हटलं गृहमंत्री पद दिलं तर आपण विचारू करू. मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल, ते सांगतील तेच मी करेन असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या मी विद्यार्थ्यांसाठी फिरतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा या समस्या विध्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा, त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. त्याचानुषंगाने मी हा दौरा करतोय.

मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो. मात्र माझ्यासाठी राज साहेबानी प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय. त्यामुळे दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. सत्ता बदलाचे मला काही वाटत नाही. मी बातम्या वाचतच नाही. माझं फोकस क्लिअर आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे. यासाठी मी स्वतः विध्यार्थ्यांना उपलब्ध होईन. यासाठी माझा नंबर त्यांना देतोय.

अमित ठाकरे तुम्ही जाईल तिथं बोलायला हवं? बातमी द्यायला हवी असे पत्रकारांनी विचारले असता "संजय राऊत सगळं पुरवतात ना?" असा मिश्किल टोला ठाकरे यांनी लगावला. ते सध्या तुरुंगात आहेत ना?असा प्रश्न विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले, "मला संजय राऊत यांची रिप्लेसमेंट नाही बरं का." त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT