I didnt get any call from seniors of party for Maharashtra Vidhan Sabha election.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : आबा बागुल म्हणातात, पक्षश्रेष्ठींचा फोनच नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मी निवडणूक लढवावी हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांनी घेतला आहे. ही लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नाही तर भाजपाशी आहे. भाजपाचे राज्यातील एक एक उमेदवार कमी करण्याची गरज आहे. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. मी आतापर्यंत केलेल्या विकास कामांवर मतदारांकडे मत मागणार आहे. मात्र, माझी मनधरणी करण्यासाठी अद्याप कोणाचाही फोन आलेला नाही असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नगसेवक आबा बागुल यांनी व्यक्त केले.  

अश्विनी कदम या माझ्या लेकीसारख्या आहेत हे मला मान्य आहे. पण, त्यांच्यावर अन्याय झाला त्यावेळी त्या 2012मध्ये महापालिकेच्या निवडणूकीला अपक्ष उभ्या होत्या. त्यांनी काम केलं होतं म्हणून त्या उभ्या राहिल्या. त्यांच्यासारखीच माझी देखील अनेक कामे आहे. त्यामुळेच मी उभा राहत आहे. दहा वर्ष काहीही काम न करणाऱ्या आमदारांशी माझी लढाई आहे. माझी मनधरणी करण्यासाठी अद्याप कोणाचाही फोन आलेला नाही.

दरम्यान पर्वती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरवात केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, "मला मतदार संघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे. त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा नक्की माघार घेतील.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT