IAS Pooj Khedkar Esakal
पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप! चोराला सोडण्यासाठी DCP वर टाकला होता दबाव

Pooja Khedkar Case: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिने चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात चर्चेत असलेल्या आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे.

प्रोबेशनर आयएएस अधिकारी पूजा खेडकरने आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगण्यात येत आहे. चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी खेडकरने डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

यासह पुण्यात राहत असताना पूजा खेडकर वापरत असलेल्या खासगी ऑडी कारवर 21 वेळा चालान झाल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र सरकारला माहिती दिली आहे की, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिने चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

ही बाब 18 मेची असल्याचे सांगण्यात येत आहे. ईश्वर उत्तरवाडे याला पनवेल पोलिसांनी चोरीच्या एका प्रकरणात अटक केली होती. यावर खेडकर यांनी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन करून उत्तरवाडे यांना सोडण्यास सांगितले होते.

ईश्वर उत्तरवाडे निर्दोष असून त्याच्यावरील आरोप किरकोळ असल्याचे खेडकर यांनी डीसीपींना सांगितले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पानसरे यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात खेडकरने आयएएस अधिकारी असल्याची ओळख करून दिली होती. तथापि, डीसीपींना खात्री नव्हती की कॉल करणारी महिला खरोखरच आयएएस अधिकारी आहे की नाही.

ते पुढे म्हणाले की, नवी मुंबई पोलिसांनी हा कॉल गांभीर्याने न घेता उत्तरवाडे यांच्यावर कारवाई केली. आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे.

32 वर्षीय आयएएस अधिकाऱ्याच्या वर्तनाची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि गृह विभागाच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याशी संपर्क साधला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

गृह विभागाच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून डीसीपी पानसरे यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यामार्फत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दोन पानी अहवाल पाठवला. सुजाता यांच्याकडे गृहखात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.

गेल्या काही काळात केलेल्या गैरप्रकारांमुळे पूजा खेडकर चर्चेत आली असून, दररोज तिचे नवे नवे कारणामे समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

Vice President election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ दोन पक्षांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Uran Fire: मोठी बातमी! सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात भीषण आग, उरणमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Updates : जळगावच्या पाचोर्‍यातील हडसन जवळ चौथ्या वाहनाचा अपघात

Yermala Crime : सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या ट्रकमधून दिवसाढवळ्या चोरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल; मागील चालकांनी केला प्रतिकार, तरीही चोरटे फरार

SCROLL FOR NEXT