Chartered_Accountant 
पुणे

सनदी लेखापालांसाठी दिलासादायक बातमी; कोरोना उपचारासाठी मिळणार आर्थिक मदत!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना'काळात ऑडिटींगसह इतर  कामांसाठी सनदी लेखापालास (सीए) 'कोरोना' झाला तर त्यांना दीड लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय द इंस्टिट्यूट ऑफ चार्टर अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतला आहे. 'आयसीएआय'च्या निधीतून मदत करण्यात येणार आहे.

लाॅकडाऊननंतर अनलाॅकमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले आहेत, पण 'कोरोना'मुळे धाेका टळलेला नाही. उलट पुण्यात तर रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा स्थितीत 'सीएं'ना बँका, कंपन्यांचे कार्यालये, मोठ्या संस्था यासह अन्य ठिकाणी कामासाठी जावे लागते. अनेकांशी भेटी होतात. सोशल डिस्टन्स राखला तरी धोका पूर्णपणे टळलेला नसतो. याचा विचार करून 'आयसीएआय'ने चार्टर्ड अकाऊंटंट बनेव्हलंट फंडातून (सीएबीएफ) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

'सीए'ना कोरोनाची लागन झाल्यास 'कोरोना' पाॅझिटिव्ह अहवालासह इतर कागदपत्र सादर करावे लागतील. त्यानंतर मदत दिली जाईल. पण हा निधी फक्त कोरोना उपचारासाठीच वापरावा लागणार आहे. त्याचा वापर न झाल्यास हा निधी परत करावा लागणार आहे. 

अधिक माहिती https://cabf.icai.org या संकेतस्थळावर आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT