ICCR president Dr Vinay Sahastrabuddha preference to dance courses skill pune
ICCR president Dr Vinay Sahastrabuddha preference to dance courses skill pune sakal
पुणे

ICCR : आयसीसीआर देणार नृत्य अभ्यासक्रमांना अधिमान्यता; डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : योगशास्त्र शिकवणाऱ्या अनेक संस्था अमेरिकेसारख्या देशात सुरू झाल्या आहेत. मात्र तेथे योगाचे चुकीचे, विकृत रुप शिकवले जाते. हीच बाब कथक, भरतनाट्यम यांसारख्या भारतीय नृत्यप्रकारांबाबत घडू नये, यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) येणाऱ्या काळात या नृत्यप्रकारांच्या अभ्यासक्रमांना अधिमान्यता देणारी संस्था म्हणून काम करेल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्याशी सोमवारी (ता. १५) वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, उपाध्यक्ष गणेश कोरे आदी उपस्थित होते.

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘‘रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’नंतर एकाही भारतीय साहित्यकृतीला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. त्यामागील एक कारण म्हणजे भारतीय साहित्यकृतींचा विश्व भाषांमध्ये फारसा अनुवाद होत नाही. ही कसर भरून काढण्यासाठी परिषदेतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील.

भारतीय तंतुवाद्य जगभरात पोहोचली आहेत. मात्र तेथे त्यांच्या देखभालीची, दुरुस्तीची व्यवस्था नाही. त्यासाठी भारतातील कारागीरांना परदेशात नेऊन तेथे तंतुवाद्य देखभाल शिबिराचा उपक्रम पहिल्यांदाच परिषद राबवणार आहे. तसेच, विविध देशांतील राष्ट्रीय ग्रंथालयांमध्ये भारताविषयक पुस्तकांची संख्या किती आहे आणि पुस्तकांमध्ये भारताबद्दल दिलेली माहिती किती तथ्याधारित आहे, याचे सर्वेक्षण परिषदेने केले आहे.’’

‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा’

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘‘काही काळापूर्वी ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ असा एक चित्रपट आला. नॉर्वेच्या लोकांनी तो एक चित्रपट म्हणूनच पाहिला. त्याने काही लगेच भारत-नॉर्वे संबंधांमध्ये काही फरक पडला नाही. त्यामुळे ‘द केरला स्टोरी’ असो किंवा अन्य काही, चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा.’’

जागतिक संस्कृती दिनानिमित्त व्याख्यान

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी जागतिक संस्कृती दिनानिमित्त, २१ मे रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती आंतरराष्ट्रीय व्याख्यान’ आयोजित करण्यात येते. दरवर्षी दिल्लीत होणारा हा कार्यक्रम यंदा पहिल्यांदाच दिल्लीबाहेर, पुण्यात होत आहे.

रविवारी (ता. २१) सायंकाळी ५.३० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या विश्वभवन सभागृहात हे व्याख्यान होईल. यावेळी राज्यसभा खासदार व नृत्यांगना डॉ. सोनल मानसिंग या ‘भारतीय नृत्य परंपरा आणि सौम्य संपदा’ या विषयावरील व्याख्यान गुंफणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT