पुणे

‘आयसीआयसीआय लाइफ’चा इंडेक्स फंड सादर

CD

‘आयसीआयसीआय लाइफ’चा
इंडेक्स फंड सादर

मुंबई, ता. १८ : ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ कंपनीने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप्स) अंतर्गत ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर केला आहे. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या व आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देत, दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आहे. हा फंड सिग्नेचर अश्युअर, स्मार्टकिड अश्युअर, स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस अशा इतर युलिप योजनांद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनांमध्ये आयुर्विम्याची सुविधाही असेल.
या फंडाची रचना ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’नुसार करण्यात आली आहे. या निर्देशांकात ‘बीएसई’च्या लार्ज आणि मिड-कॅप गटातील ३० कंपन्यांची निवड केली जाते. नियामक मार्गदर्शक तत्त्वांमुळे एखादा शेअर निवडता आला नाही, तर त्याऐवजी पात्र असलेला पुढील शेअर यामध्ये निवडला जातो; जेणेकरून ३० शेअरचा गट कायम राहील. दर सहा महिन्यांनी या निर्देशांकाचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल आणि संतुलन केले जाते, असे कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

Pune News : पुण्यात आठ मतदारसंघांत मोठ्या फेरबदलाची शक्यता! तब्बल १४ लाख मतदार वगळणार

Marathi News Live Updates : जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती; ४० जण रुग्णालयात दाखल

Plane Service : पुणे-दिल्ली विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर

SCROLL FOR NEXT