पुणे

आयडीबीआय बँक विक्रीचा निर्णय धोकादायक : उटगी

CD

पुणे, ता. १७ : ‘‘आयडीबीआय बँक विदेशी कंपनीला विक्री करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यावर याच बँकांच्या माध्यमातून देशात हरित क्रांती, श्‍वेत क्रांती व विकसनशील राष्ट्राची पायाभरणी झाली. हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे,’’ असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्‍वास उटगी यांनी केला.
आयडीबीआय बँक विदेशी कंपनीला विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते. उटगी म्हणाले, ‘‘नफ्यात सुरू असलेली बँक विदेशी गुंतवणूकदारांच्या ताब्यात देऊन केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या राष्ट्रीय संपत्तीवरील हक्कावर गदा आणत आहे. या निर्णयाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. केंद्र सरकार आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेला हरताळ फासत राष्ट्रीय संपत्ती विकण्याचा प्रयत्न करत आहे.’’
तिवारी म्हणाले, ‘‘अर्थव्यवस्थेतील तूट भरून काढण्याच्या व परकीय गुंतवणुकीच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकार नफ्यातील व देशाच्या विकासाचा पाया असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या ५१ टक्क्यांपेक्षा जास्त हिश्श्याची विक्री करत आहे. राष्ट्रीय बँक विदेशी भांडवलशाहीच्या गळ्यात घालणे आत्मघातकी कृत्य आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT