पुणे

दि पूना मर्चंट्स चेंबरकडून ‘आदर्श व्यापारी’ पुरस्कार जाहीर

CD

मार्केट यार्ड, ता. २७ : पुना मर्चंटस चेंबरच्या वतीने व्यापारमहर्षी उत्तमचंद उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारे आदर्श व्यापारी पुरस्कार शुक्रवारी (ता. २७) जाहीर करण्यात आले आहेत.

यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील ‘जस्ट युनिव्हर्सल’चे संचालक उज्वल पारसमल पगारिया, जिल्हास्तरीय पुरस्कार पुण्यातील चितळे उद्योग समूहाचे संचालक संजय नरसिंह चितळे, पुणे शहरस्तरीय पुरस्कार रेनबो हाउसिंगचे सुनिल पोपटलाल नहार यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच चेंबरच्या सभासदांमधून दिला जाणारा विशेष पुरस्कार नवीन पेढीचे संस्थापक जयभगवान गोवर्धन गोयल, युवा व्यापारी पुरस्कार विरल इंटरनॅशनलचे संचालक विरल रमेश पटेल, तर तसेच वीरेन गवाडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार राहुल खळदकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे हे एकतिसावे वर्ष असून, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, (ता. ६ मार्च) सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून, विशेष अतिथी म्हणून सहकार व नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच महापौर मंजूषा नागपुरे उपस्थित राहणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ईश्वर नहार, आशिष दुगड, रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, नवीन गोयल, दिनेश मेहता उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT