ideal village Ambegaon taluka Saffron Mango Dindi by women in Kurwandi  sakal
पुणे

आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव कुरवंडीत महिलांनी काढलेल्या केशर आंबा दिंडीला उस्फुर्तप्रतिसाद

आंबेगाव तालुका कृषी अधिकारी व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने कृषी संजीवनी मोहिमेनिमित्त काढण्यात आलेल्या केशर आंबा वृक्षदिंडीला महिला व नागरिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.

डी. के वळसे पाटील

मंचर : आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव), आंबेगाव तालुका कृषी अधिकारी व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने कृषी संजीवनी मोहिमेनिमित्त काढण्यात आलेल्या केशर आंबा वृक्षदिंडीला महिला व नागरिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.”झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.कुरवंडी ग्रामपंचायतीपासून वृक्षदिंडीचा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांच्या हस्ते झाला. राजगुरुनगर उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे, तालुका कृषी अधिकारी टी.के चौधरी, सरपंच मनिषा सुनील तोत्रे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, मंडल अधिकारी नरेंद्र वेताळ, संजय बिराजदार, बी.के मनीषा, कैलास तोत्रे, विकास बारवे, सुशील कदम, सुनील तोत्रे अग्रभागी होते.

यावेळी ७० महिलांना केशर आंबा रोपांचे वाटप ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या प्रकल्प समन्वयक अनिता चौधरी व अरुण गभाले यांच्या हस्ते करण्यात आले. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ भरत टेमकर यांनी आंबा लागवड व भाजीपाला पिक पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने आदर्शगाव योजना अमलबजावणीसाठी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सरपंच मनिषा सुनील तोत्रे, ग्राम कार्यकर्ता रवींद्र तोत्रे व कृषी सहाय्यक प्रमिला मडके यांना प्रशस्तीपत्र देऊन बोटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मनोहर थिटे यांनी प्रास्ताविक केले. आशा गटे, सारिका तोत्रे, मनीषा जाधव यांनी व्यवस्था पहिली.

“राज्य शासनाच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती योजनेच्या अंतर्गत आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव) गावात ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था, कृषी विभाग व ग्रामस्थांनी गँबियन बंधारे, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, रस्ता कॉंक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक, भूमिगत गटर आदी कामे दर्जेदार झाली आहेत.शेताच्या बांधापर्यंत कृषी खात्याच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अन्य योजनांतूनही येथे कामे व्हावीत.असा प्रयत्न राहील”

ज्ञानेश्वर बोटे, कृषी अधिकारी जिल्हा अधिक्षक पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT