Transgende 
पुणे

आम्ही चुकीच्या शरीरात नाही, तर चुकीच्या समाजात कैद 

प्रवीण खुंटे

पुणे : स्त्री आणि पुरूषाला तुम्ही स्त्री किंवा पुरुषच आहात हे सिद्ध करावे लागते का? मग तृतीयपंथी समुहाला याची सक्ती का? तृतीयपंथी स्त्री आहे का पुरुष यापेक्षा आम्ही एक माणूस म्हणून समाज आम्हाला स्विकारणार आहे कr नाही? असा प्रश्न तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या सोनाली दळवी, चांदणी गोऱ्हे आणि ऐश्वर्या पांडव यांनी 'सकाळ'शी बोलताना उपस्थित केला.

काही दिवसांपुर्वी जिल्हा कायदेशीर मदत सेवा प्राधिकरण (डीएलएएसए), फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि ससुन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी या तिघांनी मिळून तृतीयपंथी नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ओळखपत्र द्यावे असा आदेश डीएलएएसए कडून काढण्यात आला होता. त्याला तृतीयपंथी समाजातून विरोध होत आहे.

या विषयी बोलताना दळवी म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये आम्हाला लैंगिक ओळख निवडण्याचे स्वातंत्र्य दिले असताना असा निर्णय घेण आमच्यासाठी अन्यायकारक आहे. आम्ही चुकीच्या शरिरात नाहीतर चुकीच्या समाजात कैद आहोत. भारतीय असल्याची सर्व ओळखपत्र आमच्याकडे आहेत. त्यावर आम्ही तृतीयपंथी असल्याचेच नमुद केले असताना हे आणखी वेगळे ओळखपत्र कशासाठी.

चांदणी गोऱ्हे म्हणाल्या, आम्हाला वेगळ काही देण्याची गरज नाही. आम्हाला केवळ समानतेचा अधिकार द्या. समाजाने आधीच आम्हाला वेगळ काढले असताना त्यात आणखी याची भर का घातली जात आहे. मी एकदा शासकीय रुग्णालयात काही तृतीयपंथीयांना समुपदेशनासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी महिला डॉक्टरांनी आमची तपासणी करण्यास नकार दिला होता. तुम्ही संध्याकाळी या, आमच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारून सांगते अशा स्वरुपाचा प्रतिसाद आम्हाला मिळाला होता. आता तुम्ही त्याच डॉक्टरांच्या मार्फत आमची पुन्हा वैद्यकीय तपासणी करायला सांगत आहात. कशासाठी?

ऐश्वर्या पांडव म्हणाल्या, ओळखपत्र देणार आहेत म्हणजे नक्की काय देणार आहेत. हे समजायला काही मार्ग नाही. आम्हाला केवळ माणूस समजा आणि समानतेची वागणूक द्या एवढीच आमची इच्छा आहे.

डीएलएएसएला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये तुम्ही कशाच्या आधारे आम्हाला तृतीयपंथी ठरवणार आहात. अशी विचारणा करण्यात आली केली आहे. 
- सोनाली दळवी

तुम्ही स्त्री आणि पुरुषाला असे ओळखपत्र देत असाल तर आम्हालाही द्या. स्वतः वैद्यकीय अधिकारीही आम्हाला नीट समजून घेऊ शकत नसल्याचे अनेक अनुभव आम्हाला आलेले आहेत. 

- चांदणी गोऱ्हे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT