पुणे

Coronavirus : कोरोनासंबंधित तक्रार आहे? प्रशासनाने आणलीये सुविधा

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक 020- 26123371 /1077 (नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत) आहे. त्यावर कोरोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

लॉकडाऊन परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय प्रभावित झाल्यामुळे कामगार विस्थापित/बेरोजगार व परराज्यातील अडकलेले कामगार या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या तक्रारींबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 020- 26111061 आणि मोबाईल क्रमांक 7517768603 असा असून, यावर कामगारांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. या तक्रारींबाबत उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष (020- 29706611) स्थापन करण्यात आला असून, या नियंत्रण कक्षात सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकता. त्यासाठी सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: तुरुंगातून बाहेत येताच केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान! उद्या घेणार पत्रकार परिषद

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

GT vs CSK Live IPL 2024 : सीएसकेची अवस्था बिकट; डाव सावरणार मिचेल बाद

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

SCROLL FOR NEXT