download (2).jpg 
पुणे

रस्त्यावर थुंकाल तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल

सकाळवृत्तसेवा

पुणे : रस्त्यावर थुंकाल तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंड ही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान,गुटखा, तंबाखु घाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठपेक्षा अधिक जणांवर महापालिकेने कारवाई केली आहे. 

महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातंर्गत गेल्या तीन दिवसापासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. बिबवेवाडी, टिळक रस्ता, औंध, विश्रांतवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक हे देखील सहभागी झाले आहेत.

रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आदीसाठी महापालिका वेळोवेळी नागरीकांमध्ये जनजागृती करीत असते. त्यानंतरही नागरीकांकडून अस्वच्छता केली जाते. पुन्हा एकदा महापालिकेने जनजागृतीबरोबरच धडक कारवाई करण्याची भुमिका घेतली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या भागांत कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. 

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाई बाबत मोळक यांनी माहिती दिली. " साठहून अधिक नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये उच्च शिक्षितांपासून ते रिक्षा चालक, टेम्पो चालक अशा सर्वांचा समावेश आहे. महापालिकेचे कर्मचाऱ्यांना एखादी व्यक्ती रस्त्यावर थुंकताना आढळली तर त्या व्यक्तीला पाण्याची बाटली आणि फडके देऊन रस्ता साफ करण्यास सांगितले जाते. त्याच प्रमाणे त्यांच्याकडून शंभर रुपये दंडही वसुल केला जात आहे. अशा प्रकारे रस्ता साफ करावा लागण्याची वेळ आल्यानंतर संबंधित व्यक्तीला लाज वाटते. तो त्याची चुकही कबुल करतो आणि परत अशी चुक करणार नाही असे नमूद करीत आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT