पुणे

अपंगांच्या रॅम्पकडे दुर्लक्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेने विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नवी इमारत बांधली, परंतु अपंगांच्या रॅम्पकडे दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या रॅम्पची दुरवस्था झाली असून, तातडीने नवा कायमस्वरूपी रॅम्प उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कनीज सुखरानी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

दैनंदिन कामासाठी महापालिकेत येणाऱ्या अपंगांची संख्या मोठी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार शासकीय इमारतींमध्ये व्हिलचेअरवरून येणाऱ्या नागरिकांसाठी रॅम्प उभारणे बंधनकारक आहे. नव्या इमारतीसाठी महापालिकेने सुमारे ३५ कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, अपंगांच्या रॅम्पकडे दुर्लक्ष केले आहे. जुन्या इमारतीमध्ये लाकडी फळ्या उभारून रॅम्प उभारण्यात आला आहे. त्यावरील कार्पेटही फाटले आहे. तसेच त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे धोकादायक झाले आहे. त्याची दखल घेऊन अपंगांसाठी कायमस्वरूपी आणि सुरक्षित रॅम्प उभारावा, असे सुखरानी यांनी निवेदनात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT