Pune Municipal Sakal
पुणे

कामाकडे दुर्लक्ष करणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना पडले महागात

आयुक्तांनी सांगूनही कात्रज येथील नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष करणे महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आयुक्तांनी (Commissioner) सांगूनही कात्रज येथील नालेसफाईच्या कामाकडे (Drainageline Work) दुर्लक्ष करणे महापालिकेतील (Municipal) तीन अधिकाऱ्यांना (Officer) चांगलेच महागात पडले आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस (Notice) बजाविण्यात आली आहे. नोटिसा मिळताच अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. त्यामुळे कारवाईचा (Crime) बडगा उगारल्यानंतर कर्मचारी आणि अधिकारी काम करीत असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे. (Ignoring the work cost the municipal officials dearly)

कात्रज येथील स्मशानभूमीजवळील नाल्यावर हा प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी फेब्रुवारी महिन्यात या परिसरात भेट दिली होती. त्या वेळी नाल्यात मोठ्या प्रमाणावर राडारोडा आणि कचरा असल्याचे समोर आले होते. तसेच सीमाभिंत देखील ढासळलेली असल्याचे दिसून आले होते. त्या वेळी तातडीने नालेसफाई करून घ्यावी, तसेच भिंतदेखील बांधून घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. परंतु क्षेत्रीय आयुक्त तीन आणि चार यांच्या हद्दीवर हा नाला येत असल्याने कोणीच काम केले नाही. तर मुख्य खात्यातील अधिकाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, पावसाळा तोंडावर आला आहे. चार दिवसांपूर्वी पुन्हा आयुक्तांनी त्या ठिकाणी भेट दिली. प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे समोर आले. नाल्याची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने भडकलेल्या आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार एक अधीक्षक अभियंता आणि दोन कार्यकारी अभियंता यांना अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजाविल्यानंतर जागे झालेल्या यंत्रणेने नालेसफाई आणि दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू केली आहे. दोन वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याच्या पुराने शहरात हाहाकार माजविला होता. आंबिल ओढ्याला पूर आल्यानंतर या ओढ्याला देखील मोठ्या प्रमाणावर पाणी येते. त्यातून वित्तहानी होण्याची शक्यता वाढते, असे असून देखील अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याचे यावरून उघड झाले आहे.

आयुक्तांनी सूचना देऊन नाले सफाईचे काम सुरू न केल्यामुळे तीन अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. कात्रज येथील नाले सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT