Indira Gandhi National Open University
Indira Gandhi National Open University esakal
पुणे

इग्नूतर्फे आठ नवे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) वतीने आठ नवे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत ही १५ मार्च पर्यंत असल्याचे इग्नूच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी २०२२ पासून हे नवे अभ्यासक्रम अंतर्भूत केल्याचे पुण्यातील विभागीय संचालक डॉ. डी.आर.शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘समाजाची गरज ओळखून इग्नूच्या वतीने रोजगाराभिमुख नव्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.

त्यामध्ये अगदी मानवी स्थलांतरापासून ते अन्न सुरक्षेपर्यंतचे पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका असे विविध प्रकारातील अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहे.’’ जानेवारीच्या सत्रासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांसापासून नोकरदारांपासून सर्वच या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.

नवे अभ्यासक्रम

  • एम.ए. (सीएसआर)

  • एम.ए. (शहरी अभ्यास)

  • पदव्युत्तर पदविका (स्थलांतर आणि जनसमहू)

  • एम.ए. (पर्यावरणीय आणि व्यावसायिक आरोग्य)

  • एम.ए. (शाश्वत विज्ञान)

  • एम.एससी. (फूड सेफ्टी ॲन्ड क्वालिटी मॅनेजमेंट)

  • पदव्युत्तर पदविका कृषी उद्योग

  • फलोत्पादनातील पदविका

अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये

  • ऑनलाइन आणि ऑफलाईन प्रवेशाची व्यवस्था

  • ऑनलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन

  • तर ऑफलाईन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नजीकच्या केंद्रावर प्रत्यक्ष मार्गदर्शन

  • पात्रता ः कोणत्याही शाखेतील पदवीप्राप्त कोणतीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकते

  • माध्यम ः इंग्रजी आणि हिंदी

  • प्रवेशाची अंतिम तारीख ः १५ मार्च

  • प्रवेशासाठी संकेतस्थळ ः https://ignouadmission.samarth.edu.in/

आकडे बोलतात...

  • इग्नूतर्फे उपलब्ध अभ्यासक्रम ः २५०

  • इग्नूचे विभागीय केंद्रे ः ६७

  • पुणे विभागीय केंद्राद्वारे संचलित होणारे अभ्यासक्रम ः १४५

  • पुणे विभागातील सरासरी विद्यार्थ्यांची संख्या ः ६ लाख ५० हजारांपेक्षा अधिक

  • विद्याशाखांची संख्या ः २१

एस.सी.आणि एस.टीसाठी निःशुल्क प्रवेश ः

अनुसूचित जाती आणि जनजातीच्या (एससी आणि एसटी) विद्यार्थ्यांना इग्नूच्या वतीने ५५ अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना फक्त २०० रुपयांचे नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. अभ्यासक्रमांची यादी इग्नूच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT