illegal abortion Shri Ram Hospital in Nira Purandar case filed against doctor pune crime police  sakal
पुणे

Abortion Case : आणखी एक कळी जन्माआधीच खुडली

राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी

योगीराज प्रभुणे yogiraj.prabhune@gmail.com

पुणे : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राज्यात होत असतानाच निरा (ता. पुरंदर) येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली. या विरोधात रुग्णालयातील डॉ. सचिन रणनवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भपाताचे हे प्रकरण उघड झाल्याने आणखी एक कळी जन्माआधीच खुडली गेली.

राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भविष्यातील भयंकर सामाजिक संकट निर्माण होण्याचा धोका आहे. अशा पार्श्वभूमिवर मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भपात करून स्त्री भ्रुणहत्या केल्याची घटना पुढे आली.

या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येल्लमपल्ली यांनी या बाबत जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या बद्दल ‘सकाळ’शी बोलताना डॉ. येल्लमपल्ली म्हणाले, “राज्याकडून स्त्री भ्रूण हत्येबद्दल माहिती मिळाली.

त्या आधारावर पथकासह आम्ही निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये पोचलो. पण, आम्ही पोचण्यापूर्वी रात्रीच गर्भपात करून रुग्णाला घरी सोडण्यात आले होते. संबंधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याची कोणतीही नोंद डॉक्टरांनी ठेवली नव्हती. त्यामुळे रुग्ण येथे आलाच नव्हता, अशा पद्धतीने सर्व व्यवस्था केली होती.”

असे झाले उघड

श्रीराम हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्रावर गर्भपात करणाऱ्या रुग्णाचे नाव दिसले नाही. त्यानंतर गर्भपात करणाऱ्या रुग्णाबद्दल विचारले असता डॉ. रणनवरे यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. गर्भपात करणाऱ्या रुग्णाचा क्रमांक मिळाल्याने थेट त्याच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधला.

त्यावेळी रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले की, डॉ. सचिन यांनी आम्हाला कोणतीही औषधे दिली नाहीत. ती औषधे घेण्यासाठी येणार आहे. त्यातून गर्भपात श्रीराम हॉस्पिटलमध्ये रात्री झाला असल्याचे उघड झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बाबत पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन तपास केले.

गर्भलिंग निदान करणारे रॅकेट

या संपूर्ण प्रकरणात गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करण्यापर्यंतची व्यवस्था बरकडे नावाच्या एजंटमार्फत करण्यात येत असल्याचीही खळबळजनक माहिती पुढे आली. या भागात बेकायदा गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

का केला गर्भपात?

गर्भलिंगनिदान करणाऱ्या महिलेला पहिली मुलगी होती. त्यामुळे दुसऱ्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर गर्भलिंग निदान करण्यात आले. हे गर्भलिंग निदान नेमके कुठे झाले, याचा तपास पोलिस करत आहेत. पण, दुसरी मुलगी नको, हे गर्भपातामागचे मुख्य कारण असल्याचे उघड झाले आहे. गर्भपात झालेल्या महिलेला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करून तिची सविस्तर तपासणी करणे आवश्यक आहे, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

“राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाच्या हेल्पलाइनवर गर्भपाताबाबतची तक्रार आली होती. गर्भलिंग निदान केले असून, गर्भपातासाठी श्रीराम हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याची माहिती यात दिली होती. त्या आधारावर जिल्हा शल्यचिकित्सकांचे पथक घटनास्थळी पोचले. त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या झाल्याचे उघड झाले,”

- डॉ. राधाकृष्ण पवार, उपसंचालक, पुणे परिमंडळ, आरोग्य खाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT