पुणे

हॉटेलच्या आडून अवैध दारूविक्री

CD

उरुळी कांचन, ता. १७ : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांआडून सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, पोलिसांनी ''हॉटेल गुरू चायनीज पॉईंट'' आणि ''जगदंबा हॉटेल''वर छापे टाकून दारूसाठा जप्त केला. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ‘हॉटेल गुरू चायनीज पॉईंट’मध्ये चायनीज पदार्थांच्या नावाखाली बेकायदेशीर दारूविक्री सुरू होती. त्यानुसार पोलिसांनी २६ ऑक्टोबरला रात्री छापा टाकून हुसेन गफ्फुर शेख (वय ४२, सध्या रा. उरुळी कांचन; मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) याला अटक केली. दुसऱ्या कारवाईत, खेडेकर मळा परिसरातील जगदंबा हॉटेलवर रविवारी (ता. १५) सायंकाळी छापा टाकण्यात आला. येथून सुग्रीवदास शिवनाथ साकेत (वय ५३, सध्या रा. खेडेकर मळा; मूळ रा. रीवा, मध्य प्रदेश) याच्याकडून १,७८० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या २२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सलग घटनांमुळे परिसरातील हॉटेल्स जेवणासाठी आहेत की दारूविक्रीची केंद्रे बनली आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

किरकोळ कारवायांनी मोठे रॅकेट थांबणार का?
एकीकडे चायनीज सेंटर, तर दुसरीकडे हॉटेलमध्ये दारूसाठा सापडल्याने अवैध दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि कर्मयोगी मणिभाई देसाई यांनी दारूबंदी केलेल्या भूमीतच अवैध दारूविक्री फोफावत असल्याने नागरिक संतप्त आहेत. पोलिसांकडून अधूनमधून छापे टाकले जात असले तरी, केवळ विक्रेत्यांना पकडून किंवा किरकोळ साठा जप्त करून हे मोठे जाळे उद्ध्वस्त होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दारूविक्री करणारा व दारू पिणारा कोणीही असो, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अवैध धंदे चालू देणार नाही. माहिती दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल.
- बापूराव दडस, उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल खून खटल्याची सुनावणी चार डिसेंबरला

महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम बदलले! आता १२ वर्षांखालील मुलांना एकट्यानं प्रवेश बंद; सोसायट्यांची जबाबदारी वाढली

Paradh News : मोबाईल उघडल्या नंतरच महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या आत्महत्याचे कोढे उलगडणार.....? चार दिवसानंतर ही महाराजांच्या आत्महत्याचे गूढ कायम

Amravati News : नल-दमयंती सागर झाला अबोल! पक्षिमित्रांना लागली चिंता, दुष्काळाचे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT