पुणे

तारापूरच्या हॉटेलवर पोलिसांचा छापा; कारवाईत अवैध दारुसाठा जप्त

CD

तारापूरच्या हॉटेलमधून
अवैध दारूसाठा जप्त

आंबे, ता. ७ ः रंगपंचमी आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी तारापूर (ता. पंढरपूर) येथील हॉटेल रविराजवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. कारवाई दरम्यान १६ हजार रुपये किमतीचा अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात हॉटेल मालक व चालकाविरोधात मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील हॉटेलमध्ये अवैध दारू विक्रीसाठी साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी शुक्रवारी रात्री हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. देशी विदेशी दारूसह विविध कंपन्यांच्या बियरचा साठा आढळून आला. पोलिसांनी दारू साठ जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी.वाय मुजावर व त्यांच्या टीमने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai News: इमारतीत प्रवेश नाकारला, दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं, महापालिकेवर धडक; नेमकं प्रकरण काय?

मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

Latest Marathi News Live Update: बीकेसीमध्ये विस्तारासाठी एनएसईनंतर आता बीएसईची तयारी

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

SCROLL FOR NEXT