पुणे

शेंद्री फाट्यावर टेम्पोतून जनावरांची वाहतूक उघड,चालक पसार

CD

टेम्पोतून जनावरांची अवैध वाहतूक
कुर्डुवाडी-बार्शी रोडवरील घटना
.............
पांगरी, ता. २२ : कुर्डुवाडी-बार्शी रोडवरील शेंद्री फाट्याजवळ रविवारी (ता. २२) सकाळी सहाच्या सुमारास टेम्पोतून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
याबाबत खंडू आगतराव जाधव (वय २६, रा. शेंद्री, ता. बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १३ ए. एक्स. ३१३२) मधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते शेंद्री फाट्यावर थांबले असता संबंधित टेम्पो तेथे आला. वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने टेम्पो न थांबवता पुढे नेला. त्यानंतर पाठलाग करून वाहन शेंद्री फाट्याजवळ थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोच्या मागील भागात जर्सी गायी व लहान वासरे बांधलेली आढळली.
दरम्यान चालक वाहन सोडून वांगरवाडी शिवाराच्या दिशेने पळून गेला. बार्शी तालुका पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. टेम्पोची पाहणी केली असता सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या ६ काळ्या-पांढऱ्या जर्सी गायी आढळल्या. तसेच सुमारे २ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण अंदाजे ३ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Metro Pillar: मुंबई मेट्रो पिलर क्रॅक प्रकरण; व्हीडिओ पोस्ट करत एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण, दावे फेटाळत सत्य सांगितलं!

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

SCROLL FOR NEXT