Bogus Liquor Seized sakal
पुणे

Crime News : बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई; 85 लाखांची बनावट दारू जप्त

पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने एका बनावट बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मंगळवारी रात्री कारवाई केली.

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने एका बनावट बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मंगळवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत सुमारे 85 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई सहभागी झाले होते.

गोव्यावरून बनावट दारू घेऊन एक कंटेनर मुंबईच्या दिशेने निघाला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करून आणि सापळा रचून मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ ही बनावट दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला.

विशेष म्हणजे या कारवाईत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई स्वतः सहभागी झाले होते. यावेळी हा संशयित कंटेनर बाजूला घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात बनावट दारू आढळली. हा कंटेनर आणि त्यातील सुमारे 85 लाख रुपयांची बनावट दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे.

शंभूराजे देसाई म्हणाले, 'शेजारच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट बेकायदेशीर दारूवर कारवाई करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. आजची कारवाईही त्या मोहीमेनुसारच झालेली आहे. यातील संपूर्ण दारू बनावट आहे. हे बनावट दारू विक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन तपास करण्यात येईल.'

उत्तर देण्यास टाळाटाळ

यावेळी पुणे सातारा रस्त्यावर होत असलेली अवैध दारू विक्री, वेळेचे नियम झुगारून सुरू असलेली दारूची दुकाने याबाबत येथे उपस्थित उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, "निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह बघा" असे सांगून या प्रश्नाचे उत्तर देणे संबंधित अधिकाऱ्यांनी टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT