चिखली - मोरेवस्ती, म्हैत्रेवस्ती भागात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम. 
पुणे

अनधिकृत बांधकामे जोमात

सकाळवृत्तसेवा

चिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नोटिसा देऊन कारवाई होत असल्याचे पालिका अधिकारी सांगतात; परंतु दाखवण्यापुरतीच कारवाई केली जात असल्याने, नागरिक अशा कारवाईला भीक घालत नाहीत. शहराच्या बकालपणात मोठी वाढ झाली असून, ‘अनधिकृत बांधकामे जोमात, अधिकारी कोमात’ अशी परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे.  

महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्याने काही दिवस अनधिकृत बांधकामे थांबली होती; परंतु आता वर्षभरावर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. ही संधी हेरून काही नागरिकांनी पुन्हा शहरभर अनधिकृत बांधकामाचा धडाकाच लावला आहे. पालिका अधिकारी याबाबत आपले काहीच कर्तव्य नाहीच, असे समजून गप्प आहेत.

कारवाई दाखविण्यापुरतीच
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या जात आहेत. कारवाईसुद्धा केली जात असल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत; परंतु कारवाई करताना राजकीय नेत्यांच्या सल्ल्याने ती केली जाते. राजकीय पाठबळ नसलेल्या व्यक्तीवरच कारवाई होते. इतर ठिकाणी फक्त दाखविण्यापुरतीच कारवाई केली जाते. कारवाईनंतर लगेचच बांधकाम पूर्ण केले जाते. त्यामुळे महापालिका अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमतामुळेच अशी बांधकामे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

राजकीय नेत्यांकडून आश्वासने
रेडझोन, पालिका आणि प्राधिकरणाच्या आरक्षित जागेवरील बांधकामे नियमित होत नाहीत; तरीही नागरिक अशा आरक्षित जागा खरेदी करतात. नेते, प्रश्न सोडविण्याची खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आरक्षित जागेवरील बांधकामे करण्यास प्रोत्साहन देतात. 

हजारो बांधकामे सुरू 
विशेषतः उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होताना दिसत आहेत. भोसरी, चिंचवड, परिसरातील उपनगरीय भागात गुंठा, दोन गुंडे जागा खरेदी करणारे नागरिक ही बांधकामे करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी भोसरी, चिखली परिसरात कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे सुरू असतील तर त्याची माहिती घेण्यात येईल. तसेच नोटीस देण्याचे काम सुरू असून, यापुढे कारवाई सुरू राहील. 
- प्रशांत पाटील, पालिका अधिकारी

अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या बकालपणात वाढ होते. मात्र, नागरिकांनी गुंठा, दोन गुंठे जागा घेतल्यावर ते बांधकामे करणारच, ही ठरलेली बाब आहे; परंतु त्यासाठी अशा नागरिकांना मध्यम मार्ग काढून काही नियम ठरवून देणे गरजेचे आहे. त्या नियमानुसार घरे बांधल्यास विकास थांबणार नाही आणि बकालपणात वाढ होणार नाही. 
 - विजय तापकीर, सामाजिक कार्यकर्ते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT