वनक्षेत्रातुन सुरु असलेले विनापरवाना खोदकाम. sakal
पुणे

Pune : वरवंड येथे वनक्षेत्रात बेकायदा खोदकाम ; वनविभागाचे सोईस्कर दुर्लक्ष

वरवंड (ता.दौंड) येथे वनविभागाच्या हद्दीतुन जेसीबी व पोकलॅनच्या सहायाने विनापरवाना चारीच्या आकाराचे खोदकाम सुरु करण्यात आले आहे.या खोदकामासाठी कोणतीच अधिकृत परवानगी नाही.तरीही वनविभागाच्या अतिशय कार्यक्षम व तत्पर अधिकाऱी व कर्मचाऱयांनी याकडे सोइस्कर डोळेझाक केली.

अमर परदेशी, वरवंड

वरवंड : वरवंड (ता.दौंड) येथे वनविभागाच्या हद्दीतुन जेसीबी व पोकलॅनच्या सहायाने विनापरवाना चारीच्या आकाराचे खोदकाम सुरु करण्यात आले आहे.या खोदकामासाठी कोणतीच अधिकृत परवानगी नाही.तरीही वनविभागाच्या अतिशय कार्यक्षम व तत्पर अधिकाऱी व कर्मचाऱयांनी याकडे सोइस्कर डोळेझाक केली.

वरवंड परीसरात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे.याच क्षेत्राच्या काही अंतरावर व्हिक्टोरीया तलाव आहे.या तलावातुन पाण्याची पाइपलाइन करण्यासाठी अनेकांची मागणी आहे.मात्र,वनक्षेत्रातुन ही पाइलाइन कारावी लागणार असल्याने अनेक जण वनविभागाकडे धाव घेतात.वनक्षेत्रातुन भुमिगत पाइपलाइन करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची अधिकृत परवानगी घ्यावी लागणार असल्याचे वनधिकारी सांगतात.

मात्र,रविवारी (ता.२१) वनक्षेत्रातुन बिनधास्त जेसीबी व पोकलेनच्या सहायाने बेकादया खोदकाम सुरु करण्यात आले.वनक्षेत्रातुन पोकलेन व जेसीबीच्या सहायाने चारीच्या आकाराचे कित्येक मीटर अंतरापर्यंत खोदकाम झाले.या खोद कामासाठी वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडुन कोणतीच परवानगी देण्यात आली नाही.

राजरोस पणे सुरु असलेल्या खोदकामाकडे पाहुन अनेकांनी आश्चर्य व्यक्तकेले.या कामा बाबत वनविभागाच्या अतिसक्षम व नेहमी तत्पर वनकर्मचाऱयांनी अज्ञानातसुख मानले.इकडे एकही वनकर्मचारी फिरकला नाही.त्यामुळे तालुका पातळीवरील कोणत्यावन अधिकारी महाशयांनी तोंडी परवानगी दिली का अशी शंका काहींनी व्यक्त केली.

एकाबाजुने शेतकऱयांना अधिकृत परवानगी घेण्यासाठी वरीष्ठ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तर दुसरीकडे कोणतीच परवानगी नसताना वनक्षेत्रातुन बेकादया खोदकाम केले जाते हा वनविभागाचा दुटप्पीपणा दिसुन येत आहे.याबाबत सखोल चौकशी करुन संबधीत वनअधिकाऱयावरच कारवाइ करण्याची मागणी होत आहे.n याबाबत वनपरिमंडल अधिकारी शितल खेंडके म्हणाल्या,सदर खोदकामा बाबत मला माहीती होताच वनरक्षक यांना चौकशी करण्याच्या पुढील कारवाइच्या सुचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT