crime
crime esakal
पुणे

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमीनीवर बेकायदेशीर खोदाई

सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जांभळी येथील शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून तेथे खोदाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जांभळी येथील शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून तेथे खोदाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास जांभळी येथे घडली.

राजेंद्र धनकुडे याच्यासह जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ह्दयनाथ दत्तात्रय कडू (वय 52, रा. ट्रेझर पार्क, सातारा रस्ता) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडू हे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण-कडू यांचे चिरंजीव आहे. फिर्यादी यांच्या आई उषा चव्हाण यांनी 1999 मध्ये हवेली तालुक्‍यातील जांभळी येथे गट क्रमांक 335 मध्ये साडे सहा एकर जागा सीताराम पवार यांच्याकडून खरेदी केली होती. संबंधित जागेवर कडु यांच्या कुटुंबातील सदस्य वेळोवेळी पाहणी करुन देखभाल करीत असत. दरम्यान, त्यांनी धर्मराज शिवाजी गडदे (वय 33, रा. जांभळी) यांना त्यांच्या जागेतील माळरान गायी परवानगी दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी फिर्यादीकडे फिर्यादीच्या जागेतुन जलवाहिनी टाकण्यासाठी चर खोदण्याबाबत विचारणा केली होती. त्यास फिर्यादी यांनी विरोध दर्शवून, जलवाहिनी रस्त्याच्याकडेने करण्याबाबत सांगितले. रविवारी दुपारी, फिर्यादी यांना गडदे यांनी फोन करुन त्यांच्या जागेत जेसीबी आणण्यात आला असून तेथे खोदाई सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी, त्यांची मुले व आई घटनास्थळी गेले. तेव्हा, त्यांना त्यांच्या जमीनीमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तेव्हा, त्यांच्या जमिनीत 400 फुटर लांब, चार फुट रुंद व दोन फुट खोल चर केली असल्याचे आढळले. तसेच त्यांनी वहिवाटीसाठी गेलेला रस्ता उकरुन बंद केला आहे, याबरोबरच त्यांच्या जागेतील दगडाच्या ताली, लोखंडी तारेके कुंपण, सिमेंट व लोखंडाच्या खांबांची तोडफोड केल्याचे आढळून आले. धनकुडे यांनी फिर्यादी यांची कुठलीही परवानगी न घेता, त्यांच्या जागेत घुसून चर खोदण्याचे काम केले आहे. दरम्यान, याबाबत धनकुडे यांची बाजु जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद होता.

...बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत !

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. 'बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपुर्ती राज्यात एखाद्याचे शेतच सुरक्षित राहात नसे, तर घर तरी कसे सुरक्षित राहील, याची काळजी वाटते? बाळासाहेबांनी नेहमी महिलांचा आदर केला आहे. महिलांना त्रास होऊ नये, याची ते पुरेपुर काळजी घेत होते. त्यातही माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या स्नेहपरिवारातील अभिनेत्रीला असा त्रास दिला जात आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे असे असूच शकत नाहीत.' अशा शब्दात उषा चव्हाण यांनी पत्राद्वारे आवाज उठविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT