पुणे

अवैध मासेमारी करणाऱ्या पाच नौका जप्त,‘मत्स्य व्यवसाय’ची मुणगे समुद्रांत संयुक्त कारवाई

CD

अवैध मासेमारी
करणाऱ्या पाच नौका जप्त

मत्स्य व्यवसाय विभागाची मुणगे समुद्रात संयुक्त कारवाई

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः अवैध पद्धतीने मासेमारी करणाऱ्या पाच नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने मुणगे (ता. देवगड) समुद्रात कारवाई केली. या पाचही नौका विभागाने जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एका पर्ससीन नौकेसह चार लहान नौकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील समुद्रात अवैध मासेमारी होत असल्याने गेल्या दीड वर्षापासून पारंपरिक मच्छीमारांकडून अशा मासेमारीवर कारवाई करण्याची मागणी होत होती. दरम्यान, बुधवारी रात्री मत्स्य व्यवसाय विभागाला मुणगे समुद्रात अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर देवगड आणि मालवण विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागर कुबेरकर, परवाना अधिकारी किरण बाघमारे, मालवणचे परवाना अधिकारी गणेश टेमकर आणि सागरी सुरक्षा पर्यवेक्षक यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
नौकांची तपासणी केली असता अवैध पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पाचही नौका ताब्यात घेण्यात आल्या. त्या आचरा बंदरात आणून उभ्या करण्यात आल्या आहेत.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने सागरी क्षेत्रात नियमित गस्त आणि संयुक्त कारवाया सुरू ठेवल्या आहेत. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Stock Crash: गुगलच्या शेअरमध्ये २० वर्षांतील सर्वात मोठी घसरण! का वाढलीय टेक कंपन्यांची चिंता?

Uttar Pradesh: ''उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्ता द्या, UCC लागू करु'' केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IND vs NZ 4th T20I: ग्लेन फिलिप्सचं वादळ पुन्हा घोंगावलं, भारताविरुद्ध शतकासह न्यूझीलंडला पार करून दिला २५० धावांचा टप्पा

Samruddhi Expressway: हेक्टरी एक लाखांची मदत द्या, अन्यथा रेल रोको! समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांचा सरकारला इशारा

Marathi News Live Updates : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे बद्रीनाथवरुन परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता

SCROLL FOR NEXT