जुगार खेळतांना नऊ जण ताब्यात, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शेवगाव, ता. २० : अवैधरित्या चालणाऱ्या जुगारावर छापा टाकून शेवगाव पोलिसांनी नऊ आरोपींसह तीन लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई बुधवारी (ता.२०) सकाळी १२.३० वाजता जुने दहिफळ (ता. शेवगाव) येथे करण्यात आली.
पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना जुने दहिफळ गावात लोखंडे किराणा शेजारी पिवळी ताडपत्री लावलेल्या ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मुटकुळे यानी पोलिस पथक व पंचासमक्ष तेथे छापा टाकला. यावेळी तिरट नावाचा हार जितचा जुगार खेळताना शफीक युसूफ शेख, उत्तम दगडु दिवटे, बाबासाहेब पाराजी मगर, रामदास आबासाहेब शिंदे, युनूस रूस्तुम शेख, बाळू उत्तम परदेशी, सुन्नीभाऊ सुलेमान शेख (सर्व रा. जुने दहिफळ), रामचंद्र मनोहर कुळभाऊ (रा.मुंगी), शेषराव नानासाहेब गायकवाड (रा.राक्षी) यांच्यासह जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाक्या असा तीन लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.