पुणे

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भलिंगनिदान

CD

केडगाव, ता. २० : दौंड तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या व्यक्तिच्या विरोधात यवत पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २०) गुन्हा दाखल झाला आहे. गर्भलिंगनिदान करणारा डॉक्टर नसतानाही निदान कसे करत होता, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षे गुप्तपणे चाललेला प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या संदर्भात अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिस कोठडी दिली आहे. फिर्यादीत डॉ. गुजर यांनी म्हटले की, केडगाव परिसरामध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदानाचा प्रकार घडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ गर्भलिंग निदानाचा असल्याची खात्री पटल्यानंतर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार गेली अनेक वर्षे चालू असताना आरोग्य खात्याच्या लक्षात हा प्रकार का आला नाही. सोनोग्राफी चालू असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा विषय चव्हाट्यावर आल्यावर गुन्हा दाखल करण्यास १५ दिवस लागले. याबाबतही चर्चेला उधान आले आहे. गर्भलिंगनिदान झाल्यावर अन्य जिल्ह्यातील डॅाक्टरांकडून गर्भपात केला जाता होता. गर्भलिंगनिदान करणारी टोळी असून, त्यांच्यातील पैशांच्या देवाणघेवाणीमुळे संबंधित व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

दौंडमधील आरोग्य यंत्रणा खिळखिळी
केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॅाक्टरांच्या चुकीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रंजना केसकर या महिलेला जीव गमवावा लागला आहे. या आधीही एका नवजात बालकाला व एका गरोदर महिलेला येथे जीव गमवावा लागला आहे. रंजना केसकर यांच्या मृत्यूला महिना लोटलेला नसताना बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकार समोर आला आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच डॅाक्टरवर चालविली जात आहेत. त्यामुळे रात्रपाळीला डॅाक्टर उपलब्ध नसतात. वरिष्ठांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT