Crime on Illegal Hoarding in pune sakal
पुणे

Illegal Hoarding Crime : पुणे महापालिकेकडून अनधिकृत होर्डींगविरुद्ध कारवाईचा बडगा

किवळे येथे होर्डींग पडून नागरीकांचा मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने अखेर अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला.

सकाळ वृत्तसेवा

किवळे येथे होर्डींग पडून नागरीकांचा मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने अखेर अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला.

पुणे - किवळे येथे होर्डींग पडून नागरीकांचा मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने अखेर अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. शहराच्या वेगवेगळ्या भागातील 21 होर्डींग्स समवेत 239 हून अधिक फ्लेक्‍स, बॅनर, बोर्ड महापालिकेच्या पथकांनी काढून टाकले. विनापरवाना जाहीरात होर्डींग व बोर्ड लावणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने गुन्हा दाखल केले आहे.

किवळे येथे होर्डींग पडून झालेल्या अपघातामध्ये पाच नागरीकांचा मृत्यु झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने त्वरीत अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. तर पुणे महापालिकेने देखील बुधवारपासून अनधिकृत होर्डींग्सविरुद्ध कडक भुमिका घेत होर्डींग्स काढून टाकण्याच्या कारवाईला सुरुवात केली. बुधवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागांमध्ये होर्डींग्स, फ्लेक्‍स विरुद्धची कारवाई करण्यास सुरुवात झाली.

महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत हि कारवाई करण्यात आली. होर्डींग्स 21, बोर्ड, बॅनर फ्लेक्‍स 173, झेंडे 13, पोस्टर 21, किऑक्‍स 15 असे एकूण 239 होर्डींग्स, फ्लेक्‍स काढून टाकण्यात आले. या कारवाईमध्ये 5 क्रेन, 40 बिगारी सेवक, 6 गॅस कटर, 5 वेल्डर अशा मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीचा समावेश करण्यात आला.

दरम्यान, विना परवाना जाहीरात होर्डींग्ज व बोर्ड लावणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कडक कारवाई करीत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली. दरम्यान, शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज बेकायदा होर्डींग्स, फ्लेक्‍स विरुद्धची कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT