पुणे

पोलिसांच्या धाडीनंतर हातभट्टी चालक महिला फरार

CD

उरुळी कांचन, ता. ९ : भवरापूर (ता. हवेली) येथील ओढ्यालगत बेकायदा सुरू असलेल्या हातभट्टीवर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकून १२ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सत्यभामा सुदामा राजपूत (रा. खामगाव टेक) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती फरार झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ७) दुपारी चारच्या सुमारास टिळेकरवाडी व भवरापूरच्या शिवेवर ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला हातभट्टीची दारू तयार करत असताना पोलिसांना आढळून आली. या कारवाईत १०० लिटर रसायन, ६० लिटर कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला झुडपांचा फायदा घेऊन पसार झाली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खोमणे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT