पुणे

खवणी येथे अवैध दारू वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई

CD

अवैध दारू वाहतुकीवर
एलसीबीची कारवाई

१९.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त; बोलेरो, स्विफ्टसह तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने खवणी (ता. मोहोळ) येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत १९ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून एक जीप, कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
धनराज अविनाश भोसले व ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे (दोघे रा. पोखरापूर, ता. मोहोळ) व अमर मोहन गिड्डे (रा. मोडनिंब, ता. माढा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (ता. ८) सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल हरिदास थोरात, घाडगे, दोरकर, शिंपाळे व चालक पोलिस कॉन्स्टेबल पवार यांचे पथक मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी खवणी येथील नागनाथ नर्सरीजवळ काहीजण विनापरवाना दारूची वाहतूक करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तिघे एका वाहनातून दुसऱ्या वाहनात अवैध दारू उतरवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करून धनराज भोसले, ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे व अमर गिड्डे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ९० मिलीच्या देशी दारूचे ७७ बॉक्स, जीप, कार आणि दोन दुचाकी असा एकूण १९ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT