चाकण, ता. ३ : खेड तालुक्यातील काळूस-संगमवाडी आणि रासे येथे पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे टाकून सुमारे १३ लाख रुपये किमतीचे २४ हजार लिटर रसायन नष्ट केले. ही कारवाई जेसीबीच्या साह्याने करण्यात आली असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासे येथील सुकला डोंगराच्या पायथ्याशी सावित्रीबाई राठोड (वय ५५) यांच्या हातभट्टीवर छापा टाकून ५ लाख रुपयांचे १० हजार लिटर रसायन नष्ट केले. दुसऱ्या कारवाईत काळूस-संगमवाडी येथील भीमा नदीकाठी अनिल सीतापुरे (वय ३५, रा. चिखली) याच्या भट्टीवरील ८ लाख रुपये किमतीचे १४ हजार लिटर रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रमेश दगडे, तपास पथकातील उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलिस हवालदार योगेश कोळेकर, प्रीतम ढमढेरे, पोलिस शिपाई सुमित जगझाप, संदीप जोशी, महेश कोळी, शिवाजी लोखंडे, भैरोबा यादव यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.