पुणे

अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी कंपनीला सव्वा तीन कोटींचा दंड पिंपळदरवाडीतील तलावकामात नियमांचे उल्लंघन; सात दिवसांत दंड भरण्याचे आदेश

CD

टुडे एकसाठी
अवैध गौण खनिज उत्खनन
कंपनीला सव्वातीन कोटींचा दंड
अकोले, ता. २५ : तालुक्यातील पिंपळदरवाडी येथील साठवण तलावाच्या कामादरम्यान शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनीवर महसूल विभागाने तब्बल ३ कोटी १५ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी ही कारवाई करत दंडाची रक्कम सात दिवसांत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपळवाडी येथे जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाचे काम सुरू आहे. या कामासाठी नियुक्त ठेकेदार कंपनीने तलावाच्या नावाखाली कोणतीही वैध परवानगी न घेता माती, मुरूम व दगड आदी गौण खनिजांचे उत्खनन केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी १ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारकडे तक्रार केली होती.
तक्रारीनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पंचनाम्यानुसार, परिसरातून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज काढण्यात आले असून, त्यातील काही साठा आढळून आला, तसेच खनिजाच्या वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तहसीलदार डॉ. मोरे यांनी कारवाई करत संबंधित कंपनीवर दंड आकारला. निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास शासनाच्या नियमानुसार मालमत्ता जप्त करून वसुली केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT