पुणे

बीडमध्ये अवैध सावकारी आणि कर्जमुक्तीच्या तक्रारींसाठी कक्ष

CD

बीडमध्ये अवैध सावकारी,
कर्जमुक्तीच्या तक्रारींसाठी कक्ष

चोवीस तास व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुविधा सुरू

बीड : जिल्ह्यातील वाढत्या अवैध सावकारीच्या तक्रारी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ आणि नवीन पीककर्ज वाटपातील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी ९३०७३२५५८६ हा २४ तास चालू राहणारा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या दिलेल्या क्रमांकावर लेखी स्वरूपात तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी केले आहे. या तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी सतीश सोनी यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहायक निबंधक ऋषिकेश कातळे आणि सहायक लीड बँक व्यवस्थापक श्रीकांत लोखंडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘अवैध सावकारांवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ अंतर्गत कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्या व वित्तीय संस्थांना कर्जदारांशी सौजन्याने वागण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून, वसुलीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा वापर करणे, सक्तीची वसुली करणे किंवा वाहने जप्त करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

चौकट ----
२ जून २०२६ रोजी जाहीर झालेल्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडील थकीत पीक कर्ज असलेल्या २,०४,३६६ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, अद्याप ३७,५८१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असून, त्यांनी आपल्या अडचणी पुराव्यासह या नवीन कक्षाकडे नोंदवून त्वरित प्रमाणीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तत्काळ नवीन पीककर्ज वाटप करावे, अन्यथा संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

Manoj Jarange: ''शिंदेंकडे पैसाच गेला नसेल तर त्यांना बदनाम का करायचं..? माझ्याकडे आणखी चार क्लिप'' जरांगे पाटलांनी दिला क्लू

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

Moral Policing Horror in Kolkata : १८ वर्षीय मुलासह वडिलांना विवस्त्र करून फिरवले; कोलकातामधील या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने खळबळ!

'धुमधडाका' मधील यदुनाथ जवळकर खरंच आले! अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ व्हायरल; गाडीत बसताना काढली चप्पल

SCROLL FOR NEXT