पुणे

राशीन-खरेदीदार व विकसकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

CD

सार्वजनिक जागांची विक्री; गुन्हे दाखल होणार

तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांची चौकशी होणार

राशीन, ता. २० : बिगरशेती (एनए) जागेतील सार्वजनिक वापराच्या जागांची (अमेनिटी व ओपन स्पेस) शासनाच्या अटी-शर्तीचे उल्लंघन करून केलेली विक्री उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी बेकायदेशीर ठरवत फेरफार तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. विकसक व खरेदीदारांवर गुन्हा दाखल करण्याचा व तत्कालीन तहसीलदार, मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश दिला. या निकालामुळे कर्जत तालुक्यात व महसूल विभागात खळबळ उडाली आहे. संबंधित जमिनीची राशीन ग्रामपंचायतीच्या सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणाची सुरवात माहिती अधिकार कार्यकर्ते योगेंद्र सांगळे यांनी १७ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या तक्रारीतून झाली. राशीनमधील २७ बिनशेती आदेशांमध्ये अटी-शर्तीचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी चौकशी करून सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. यातील विकसक व खरेदीदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सुमारे ९ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र गाव दप्तरी नोंदी व अन्य कागदपत्रांच्या आधारे अमेनिटी व ओपन स्पेसची विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रारीतील तथ्य मान्य करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी पाटील यांनी संबंधित फेरफार व बिनशेती आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला.

सांगळे यांनी दावा केला आहे कि, राशीनमधील इतर बिनशेती आदेशांची देखील पुढील काही दिवसात तपासणी होऊन आवश्यक कारवाई होऊ शकते. तसेच संबंधित विकसक व खरेदीदारांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ तसेच भारतीय दंड संहितेतील फसवणूक व बनवत कागदपत्रांशी संबंधित कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुन्हे दाखल होणार आहेत. दरम्यान अमेनिटी व ओपन स्पेस या सार्वजनिक वापरासाठी राखीव जागा असल्याने त्यांची विक्री कायद्याने ग्राह्य धरली जात नाही. यामुळे या आदेशाकडे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण कारवाई म्हणून पहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार दुप्पट होणार की फक्त ३१ % वाढ ? जाणून घ्या फिटमेंट फॅक्टरचं संपूर्ण गणित

Uddhav Thackeray : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Selu Traveler Accident: ट्रॅव्हलरची टिप्परला मागून धडक; गुजरात येथील १७ प्रवासी जखमी; रमणा फाट्याजवळ अपघात

तापसीच्या एका वक्तव्याने कंगना भडकली? ‘सस्ती कॉपी’ म्हणत पुन्हा तापसीला डिवचलं! नंतर पोस्ट केली डिलीट

Crime: रस्त्याकडेला उभं राहून नागरिकांवर नको त्या कमेंट्स, जाब विचारताच मोठा वाद; तरुणांच्या हाणामारीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT