पुणे

कोऱ्हाळे खुर्दमध्ये माती चोरी; डंपर सोडून चालक पसार

CD

वडगाव निंबाळकर, ता. २९ : कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) परिसरातून पाच ब्रास मातीची अवैध वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पाठलाग करून जप्त केला. साखरवाडी (जि. सातारा) येथील कारखाना परिसरात डंपर सोडून चालक पसार झाला असून, ७ लाख २० हजारांच्या मुद्देमालासह चालक-मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे अंमलदार संजय भोसले यांनी फिर्याद दिली. २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २५ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचपर्यंत त्यांची रात्रगस्तीची ड्युटी होती. पहाटे तीनच्या सुमारास कोऱ्हाळे खुर्द परिसरात गस्त घालत असताना वडगाव निंबाळकरच्या दिशेने जाणारा दहा चाकी डंपर (एमएच ११ एएल १९५९) त्यांना संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी डंपर थांबविण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालकाने साखरवाडी येथील साखर कारखान्याच्या बैलगाडा यार्डाच्या गेटमधून डंपर आत नेऊन उभा केला आणि तेथून पलायन केले. पोलिसांनी डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये पाच ब्रास माती आढळली. याबाबत वडगावचे मंडल अधिकारी गजानन पारवे आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी मातीचा पंचनामा केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत होणार

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT