पुणे

माण नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक; चार लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त

CD

पोलिसांचा इशारा धुडकावून
पळवली अवैध वाळूची ट्रक

सांगोला, ता. १४ : माण नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने पोलिसांचा थांबण्याचा इशारा धुडकावून वाळूने भरलेले वाहन भरधाव वेगाने पळवून नेल्याची घटना शनिवारी (ता. १४) सकाळी कोपटे वस्ती ते सावे (ता. सांगोला) दरम्यान घडली. याप्रकरणी वाहनमालक आण्णा सिदा खांडेकर (रा. सावे) यांच्याविरुद्ध सांगोला ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल निलेश ढोबळे यांनी फिर्याद दिली आहे.
अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच शनिवारी सकाळी आठच्या सुमारास वाढेगाव शिवारात पोलिस गेले. अशोक लेलँड कंपनीची राखाडी रंगाची बडा दोस्त मालवाहू गाडी वाळूने भरून जाताना दिसली. पोलिसांनी वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला; मात्र पोलिसांना पाहूनही त्याने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळवून नेले. गावात चौकशी केली असता, हे वाहन आण्णा सिदा खांडेकर यांचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारवाईत चार लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन आणि त्यातील अंदाजे सात हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा एकूण चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाहनमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT