पुणे

पाझर तलाव बातमी

CD

PNE26W66261
अहिल्यानगर ः महांडुळवाडीमध्ये (ता. श्रीगोंदा) पाझर तलावातून पाण्याचा अनधिकृत उपसा सुरूच असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत उपोषण केले.

ग्रामस्थांचा जनावरांसह हंडा मोर्चा
पाझर तलावातून अनधिकृत पाणी उपसा
अहिल्यानगर, ता.१६ ः श्रीगोंदा तालुक्यातील महांडुळवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जनावरांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पाझर तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा सुरूच असल्याचा आरोप करत पाझर तलावाच्या मोजणी प्रक्रियेतील हस्तक्षेप रोखण्याची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांसह जनावरांचा हंडा मोर्चा काढत उपोषण करण्यात आले. या आंदोलनात आनंदा दरेकर, रवींद्र महांडुळे, गणेश महांडुळे, रोहिदास महांडुळे, संदीप महाडुंळे, भरत घोगरे, गणेश देवकर, पोपट महांडुळे, सुभाष महांडुळे आदी सहभागी झाले. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले की, पाझर तलावाची शासकीय मोजणी निश्‍चित वेळेत व कोणत्याही परिस्थितीत विनाअडथळा पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावेत. मोजणी वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, तलावातील अनधिकृत विहिरी व पाणी उपसा तत्काळ बंद करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT