Rainfall 
पुणे

पुढील चार दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्रात बरसणार जोरदार पाऊस!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतातूर असलेला बळीराजा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातील झालेल्या पावसामुळे सुखावला आहे. शुक्रवारी (ता.१४) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस, तर उर्वरित बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. येत्या मंगळवारपर्यंत (ता.१८) मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत कोकण, गोव्यात सरासरीच्या तुलनेत ७६ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सरासरीच्या आसपास होता. तर येत्या मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्‍यता आहे. 

शहरात रिमझिम सुरूच 
शहर आणि परिसरात शुक्रवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सकाळी मात्र ऊन-पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. मात्र दुपारनंतर शहरासह उपनगरांतही बहुतांश ठिकाणी पावसाची रिमझिम कायम राहिली. तर येत्या चार दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत शहर आणि परिसरात पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी पडतील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. शुक्रवारी पुण्यात ३.७ मिलीमीटर, तर लोहगाव येथे २.६ मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. 

१ ऑगस्ट ते १४ ऑगस्टपर्यंत राज्यातील पाऊस (मिलिमीटर मध्ये) 
भाग : सरासरी पाऊस (मिमी) : प्रत्येक्ष पडलेला पाऊस (मिमी) 
मध्य महाराष्ट्र : १०५.८ : १७२.४ 
मराठवाडा : ८३ : ८१.६
विदर्भ : १४९.९ : १४२.५ 
कोकण गोवा : ४३०.६ : ७५९.४

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT